breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान, ‘या’ नेत्याचा फोटो…
मुंबई : ‘महाजॉब्स’ पोर्टलच्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान देण्यात आलेले आहे. महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती.
महाजॉब्सच्या याआधीच्या जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचा फोटो नव्हता. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य फोटो डावीकडे आहे, तर उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो देखील आहेत.