breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; रावसाहेब दानवे, अमित देशमुखांच्या घराबाहेर आंदोलने

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला यंदाच्या वर्षासाठी स्थगिती दिल्याचं सांगितल्यानंतर आता राज्यातील काही मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. दरम्यान आज मराठा क्रांती मोर्चा कडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झालेली आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पासून ठाकरे सरकार मधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. अमित देशमुख, राजेश टोपे यांच्या समोर मराठा समाजातील संघटनांनी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत आंदोलनं सुरू केलेली आहेत. अमित देशमुख यांच्या घराबाहेर तसेच पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे.

जालना मध्येही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत काहींनी त्यांचा रस्ता अडवला मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजुला केले आहे. दरम्यान मराठवाड्यातही आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी घुसून  पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला आहे. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button