breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रानअली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश…

  • मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे,माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनीही केला प्रवेश…

मुंबई | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवक,मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे,माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. आज भिवंडीसह मिरा-भाईंदर आणि औरंगाबाद सिल्लोडचे ठगन भागवत, अमरावतीमधील डॉ.मोईन देशमुख, निखत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला आहे.

आगामी निवडणुकीत या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच उपयोग होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

वाचा- #Covid-19: यूकेहून येणाऱ्या पर्यटकांना मेघालयात प्रवेश करण्यास मनाई

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button