breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भाजप खासदाराविरुद्ध कारवाई करण्याची मायावती यांची मागणी

दलित अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भाजपच्या खासदारावर कडक कारवाई करण्याची मागणी बसपाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी केली. अशा प्रकारचे वर्तन लज्जास्पद असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

भाजपचे कन्नौज येथील खासदार सुव्रत पाठक आणि त्यांच्या समर्थकांनी महसूल अधिकारी अरविंदकुमार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे दलित तहसीलदार अरविंदकुमार यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचा प्रकार लज्जास्पद आहे, असे मायावती यांनी ट्वीट केले आहे.

नियमांचे उल्लंघन करून काही प्रकल्प मंजूर करण्यासाठी खासदार आपल्यावर दबाव आणत होते त्याला आपण नकार दिला, तेव्हा खासदारांनी आपल्याला दूरध्वनीवरून शिवीगाळ केली आणि त्यानंतर समर्थकांसह आपल्या निवासस्थानी येऊन मारहाण केली, असा आरोप अरविंदकुमार यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button