breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

बाळासाहेब थोरातांची ऑफर ; …तर खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागत

मुंबई | भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑफर दिली आहे. खडसे समर्थ आणि जनमानसाचा आधार असलेले नेते आहेत. असा नेता काँग्रेसमध्ये येत असेल, तर त्याचे स्वागतच करू, असं थोरात म्हणाले आहेत.

‘मी खडसेंना फोन केला होता. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं त्यांना सांगितलं होतं. खडसेंची अवहेलना पाहावत नाही. कोणताही पक्ष समर्थ नेत्याला जवळ करण्याचा प्रयत्न करतो,’ असं सूचक वक्तव्य थोरात यांनी केलं. ‘भाजपमध्ये जनमानसाचा आधार असणारा नेता नको असतो. भाजप परप्रकाशित लोकं जवळ करतात. बहुजन समाजातील लोकांचा प्रभाव वाढू नये, याची काळजी भाजपमध्ये घेतली जाते,’ असा आरोपही थोरात यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button