breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

परळीत पंकजा मुंडेंच्या बंगल्यासमोर मनसेचा राडा, भाजप कार्यकर्ते आक्रमक

बीड | महाईन्यूज | ऑनलाईन टिम

साखर कारखान्यांकडून एफआरपीची बिले थकल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. मनसेचे कार्यकर्ते बीडमधील परळीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली.

पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून ऊसतोड मजुरांचे ‘एफआरपी’चे बिल थकल्यामुळे मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कारखान्याच्या संचालिका पंकजा मुंडे यांच्या परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची तयारी मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या घराकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. पंकजा मुंडेंच्या बंगल्याकडे जात असताना भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले.

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थी होऊन वाद मिटवला आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button