breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारण

निवडणुकीत मला पाडून दाखवाच

मंत्री अजित पवार यांनी ‘त्या’ नेत्याचे स्वीकारले आवाहन  

मुंबई | प्रतिनिधी

माझ्या भाषणामध्ये जो आडकाठी आणतो, जो मध्येच बोलतो तो निवडणुकीत पराभूत होतो. त्यामुळे माझ्या मध्ये बोलू नका, असे वक्तव्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केले. तर तुमच्या भाषणात मध्ये बोलतोय, चला मला पराभूत करूनच दाखवाच. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी हे आवाहन स्वीकारल्याने सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. राज्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडताना नागरिकांनी पहिले आहे. विधानसभा सभागृहातही एकमेकांवरील टोलेबाजीने सभागृहात वातावरण गरम होताना पहावयाला मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्याची प्रचीती आली. भाजप नेते आणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाषण करत होते. त्या वेळी एका महिला आमदाराकडून मध्येच काही सूचना त्यांना देण्यात आल्या. या वेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, तुमचे श्रीमान माझे खास मित्र आहेत. त्यामुळे माझे भाषण सुरु असताना मध्येच बोलू नका. माझ्या भाषणामध्ये आडकाठी आणणारा व मध्येच बोलणारा पुढील निवडणुकीत पडतो, असे वक्तव्य या वेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

या वेळी अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, मि तुमच्या भाषणामध्ये बोलतो. तुमचे आवाहन मी स्वीकारले. पुढील निवडणुकीत तुम्ही मला पाडून दाखवाच. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सुधीर मुनगंटीवार निरुत्तर झाले. तर सभागृहात एकच हशा पिकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button