breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

धक्कादायक! पन्नास हजारांची लाच घेताना कामोठ्यात पोलीस उपनिरीक्षकाला अटक

नवी मुंबई: कामोठे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह एका व्यक्तीला 50 हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाने संपूर्ण कामोठे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजलेली आहे. दिड लाखाची लाच मागून त्यातील 50 हजारांचा पहिला हफ्ता स्विकारणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याशिवाय, एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलेली आहे. आज दुपारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले आहे.

याप्रकरणातील तक्रारदार यांच्याविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर (वय-30) यांच्याकडे फसवणुकीचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी आला होता. त्या अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी रोहित बंडगर यांनी तक्रारदाराकडे पहिले 10 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती दिड लाखांवर त्यांचा व्यवहार ठरला होता. त्यातील 50 हजारांची लाच स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांच्यासह एका व्यक्तीला रंगेहाथ पकडलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button