breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दिल्ली विधानसभा : काँग्रेस प्रथमच आघाडी करून लढविणार निवडणूक

नवी दिल्ली | महाईन्यूज

महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीतून धडा घेत यावेळी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणूक इतर पक्षांसोबत युती करून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेराष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दिल्लीच्या इतिहासात काँग्रेस पक्ष प्रथमच आघाडी करून निवडणुकीला सामोर जाणार आहे. दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदलाला चार जागा सोडणार आहे. मात्र यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात शनिवारी उभय पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहमतीनंतरच राजदलासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पूर्वोत्तर राज्यातील आणि बिहारच्या मतदारांना आकर्षीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजदलाने दिल्लीत 10 जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने राजदलासमोर चार जांगाचा पर्याय ठेवलेला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button