breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
“तुकडे तुकडे गँगच सरकार चालवते”; काँग्रेस खासदाराचा भाजपावर निशाणा
दिल्ली | महाईन्यूज
“भारतामध्ये तुकडे तुकडे गँग अस्तित्वात आहे. ही गँगच सरकार चालवत आहे,” असा टोला काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरुर यांनी ट्विटवरुन लगावलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. त्यावरुनच थरुर यांनी भाजपावर टीका केलेली आहे.
‘तुकडे तुकडे गँग’बद्दल सरकारकडे कोणतीही माहिती नाही या बातमीचा फोटो थरुर यांनी ट्विट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच तुकडे तुकडे गँग असल्याचा टीका केलेली आहे. “देशात तुकडे तुकडे गॅंग अस्तित्वात आहे. ही गँग सरकार चालवत आहे. तेच देशाचे विभाजन करत आहेत,” असं थरुर यांनी म्हटलेलं आहे.