breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चार महिन्यांपासून ४०,००० होमगार्ड्सचे थकले मानधन; आंदोलनाचा इशारा

मुंबई | महाईन्यूज

वाहतुकीचे नियमन करताना पाऊस-उन्हाची तमा न बाळगता पोलिसांच्या खाद्याला खांदा लावून काम करणारे, सणावारावेळी आणि निवडणुकांवेळी नियोजनाच्या कामात पोलिसांना मदत करणारे तसेच मोठ्या नैसर्गिक आपत्तीवेळी राबणाऱ्या होमगार्डच्या जवानांवर स्वतःच घर चालवण्यासाठी उसने पैसे घेण्याची वेळ आलेली आहे. कारण, गेल्या चार महिन्यांपासून त्यांना अद्याप मानधनच मिळालेले नाहीये होमगार्डमधील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जुलै २०१९ मध्ये होमागार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यामुळे सन २०१९ मध्ये मिळालेला निधी वाढीव मानधनानुसार ऑगस्ट २०१९ पर्यंत वापरण्यात आला. मात्र, त्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून अद्यापपर्यंत होमगार्ड्सना मानधन मिळालेले नाही. याबाबत होमगार्डच्या कार्यालयाकडून अनेकदा सरकारला स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहेत, मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली दिसत नाहीये. सरकारकडे आधीच होमगार्डला देण्याचा १३७.८३ कोटी रुपयांचा निधी थकला आहे. त्यानंतर आता आर्थिक वर्षांच्या शेवटी म्हणजेच मार्चच्या शेवटी सरकारला पुन्हा होमगार्डसाठी १४०.५५ कोटी रुपये देणे आहे. मात्र, सरकारने अद्याप पहिलाच निधी दिलेला नसल्याने पुढचा निधी कसा मिळेल याची भ्रांत होमगार्डच्या अधिकाऱ्यांना पडली आहे. दरम्यान, जर सरकारने थकीत निधी तातडीने वितरीत केला नाहीतर होमगार्ड्सनाही आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असे होमगार्डच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button