breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट घालून कोविड वॉर्डात प्रवेश करत रुग्णांची केली विचारपूस

कल्याणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट घालून थेट कोविड वॉर्डात प्रवेश केला आणि कोरोना बाधितांची जवळ जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय ऊर्फ बंड्या साळवी आणि केडीएमसीचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

विजय साळवी यांच्यावर कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी आज थेट कल्याण गाठले. मीरा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंगावर पीपीई किट चढवले आणि थेट विजय साळवी उपचार घेत असलेल्या वॉर्डात गेले. यावेळी त्यांनी तब्येत कशी आहे? काही त्रास होतो का? अशी साळवी यांना विचारपूस केली. त्यावर मला श्वास घ्यायला थोडा त्रास होतो, असं साळवी म्हणाले. तेव्हा शिंदे यांनी साळवी यांच्या खांद्यावर हात ठेवत तू आता बरा होत आला आहे. मी डॉक्टरांशी बोललो. तुझी प्रकृती चांगली होत असून लवकरच तुला डिस्चार्जही मिळेल, असा धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच साळवी यांनी त्यांच्या आईची तब्येतही चांगली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आणि साळवींना बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

शिंदे यांनी यावेळी साळवी यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचे का? असा प्रश्नही केला. त्यावर साळवी यांनी नकार दिला. साळवी यांची विचारपूस केल्यानंतर शिंदे यांनी इतर रुग्णांचीही विचारपूस करून डॉक्टरांशीही चर्चा केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button