breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

आयुष मंत्री श्रीपद नाइक कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालंय. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली. नाईक मोदी सरकार मधील तिसरे मंत्री आहेत ज्यांना COVID 19 चं संक्रमण झालं आहे. याअगोदर गृहमंत्री अमित शाह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही नेते रुग्णलयात भरती आहेत. दरम्यान, लक्षणं नसल्याने नाईक यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.

नाईक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की, “मी आज COVID -19 ची चाचणी केली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणताही त्रास नाही त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.” ते म्हणाले की, ”जे लोक मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button