breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टापायी सुनेचा छळ केल्याचा आमदार विद्या चव्हाण यांच्यावर आरोप आहे. विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरोधात विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार चव्हाण यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 

आमदार चव्हाण यांनी हे आरोप खोटे असून परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याची तयारी आपल्या मुलाने दर्शवली होती. परंतु तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं त्यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरी मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंब पीडितेचा छळ करत होते. पीडितेला आधीची मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावले. याप्रकारानंतर घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button