आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे बाकी, ओवैसींचा भाजपला टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Asaduddin-Owaisi.jpg)
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे मोठे नेते आल्यामुळे एमआएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. प्रचाराला फक्त डोनाल्ड ट्रम्प यांना आणायचं राहिलंय, असा खोचक टोला ओवैसींनी भाजपला लगावला आहे.
हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि एमआयएम, तेलंगणा राष्ट्र समिती यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी एका सभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींच्या जागी देशाचा नवा पंतप्रधान निवडण्यासाठीची निवडणूक असल्यासारखं वाटतेय, असं म्हटलं. करवन येथील एका सभेत एका मुलानं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचारासाठी बोलवायला पाहिजे, असं म्हटलं होतं, यानंतर ओवैसी यांनी त्या मुलांचं खर आहे, आता फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनाच बोलावयाचं राहीलय, असं ओवैसी म्हणाले.
भाजपनं हैदराबाद महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारात सहभाग घेतला. यामुळे टीआरएस आणि एमआयएमनं भाजपवर टीका केली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी अमित शाह यांच्या दौऱ्यावरून भाजपवर टीका केली होती. विभाजनकारी शक्तींचा हैदराबादमध्ये घुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केसीआर यांनी केला होता.