breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

आजही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही. सरकार पाडण्याचं सोडा, तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाकरे सरकारला लगावला होता. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर सत्ता येण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केले होते. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची तयारी दर्शविली आहे.

शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू, असेही पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना खूप हवेत आहे. त्यांची स्वर्गाला बोटं टेकली आहेत, अशी टिका देखील त्यांनी केली आहे. भाजपचे सर्व निर्णय केंद्र पातळीवर घेतले जातात. पंतप्रधान मोदींनी फॉर्म्युला तयार केला आणि तो उद्धव ठाकरे यांनी मान्य केला त्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतील, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत ठाम होती. मात्र, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असे आश्वासन सेनेला कधीही दिलेले नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. या राजकीय ताणाताणीनंतर युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button