breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारण
अभिनेता रजनीकांत ३१ डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार!
![Corona to 8 on Annathe's set; Superstar Rajinikanth hospitalized](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Rajnikant.jpg)
चेन्नई । टीम ऑनलाईन
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या अभिनेता रजनिकांत याच्या राजकीय पक्षाची घोषणा अखेर ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत स्वत: रजनिकांत यांनी सूतोवाच केले आहे.
३१ डिसेंबरला घोषणा केल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये पक्षाचे कामकाज सुरू होईल, असे रजनिकांत याने म्हटले आहे.
रजनीकांत यांनी आपल्या फोरमच्या वरिष्ठ पदाधिकारी, रजनी मक्कल मंद्रामशी भेट घेतल्यानंतर एका दिवसानंतर ही घोषणा केली. नंतर बुधवारी, त्यांनी निवडणूक राजकारणाच्या त्याच्या योजनांवर “लवकरच माझा निर्णय जाहीर” करणार असल्याचे सांगितले.
“जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. मी जे काही निर्णय घेतो त्यास ते मान्य करतील असे त्यांनी म्हटले आहे. मी लवकरच माझा निर्णय जाहीर करेन, असेही म्हटले आहे.