breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अजितदादा पुन्हा फॉर्मात…कामाचा चार्ज घेताच ‘ऑन द स्पॉट निकाल’…

मुंबई | महाईन्यूज |

गेल्या दोन महिन्यांच्या महाविकास आघाडीच्या खाते वटपाच्या नाट्या नंतर अखेर सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं… मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसामान्यांची वर्दळ पहायला मिळतेय. प्रत्येकजण आप-आपले प्रश्न घेऊन मंत्रीदरबारी येत आहे. आज मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात येऊन चार्ज घेण्यास सुरुवात केली. त्यात पहिला नंबर लावला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. सकाळी 9.30 वाजता अजित पवार कार्यालयात दाखल झाले. तेव्हापासून अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री ही नेमप्लेट शोधत लोकं अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर थेट रांग लावून उभे आहेत. रखडलेली कामं किमान या नव्या महाविकास आघाडीचे सरकार तरी पूर्ण करेल, या आशेने लोकांनी दालना बाहेर एकच गर्दी करायला सुरुवात केली आहे.

रांगेत तरुणांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजन पहायला मिळतायत…काही जण आपले रखडलेली काम मार्गी लागतील या आशेने रांगेत उभे आहेत, तर,काहीजण हातात फुलांचा बुके घेऊन अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी रांगेत उभे असलेले पहायला मिळाले.

अजित पवारांनी तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर कामाचा धडाका लावायला सुरुवात केली आहे. सर्वांची भेट घेऊन ‘ऑन द स्पॉट निकाल’ या त्यांच्या नेहमीच्या शैलीत ते पुन्हा कार्यरत झाले आहेत. त्यामुळे अजित पवार पुन्हा फॉर्मात आले आहेत अशी जोरदार चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.

आता खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेलं तीन पक्षांचं महाविकासआघाडी सरकार अंतर्गत कुरबुरी संपवून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतील अशी अपेक्षा सामान्य जनतेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button