मोशीत अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा टाकत गुन्हा दाखल…
![Police raid hotel selling liquor in Moshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/drink.jpg)
पिंपरी |
अवैधरित्या दारूची विक्री सुरु असलेल्या हॉटेलवर छापा टाकला. यात ३१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हॉटलच्या चालक – मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अनंतनगर, मोशी येथे ९ मार्च रोजी ही कारवाई केली आहे. सचिन काशिनाथ दाते (वय २६.रा. मोशी, मूळ रा. भोसलेवाडी, पो. आणे, ता.जुन्नर), असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेलच्या चालक – मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या फौजी व्हेज नॉन व्हेज चायनीज नावाच्या हॉटेलमध्ये विनापरवाना देशी, विदेशी दारू व बिअरची विक्री केली जाते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यात सहा हजार १९० रुपयांची रोकड, १४ हजार ५५० रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या व ११ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा ३१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे.
वाचा- GOODNEWS! आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…