breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

Narendra Modi : जागतिक प्रसिद्ध नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल

पंतप्रधान मोदींनी २१ देशांच्या नेत्यांना टाकलं मागे

Narendra Modi : जागतिक प्रसिद्ध नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे. मोदींनी जगातील सर्व नेत्यांना मागे टाकलं आहे. जगातील ७६ टक्के लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय जागतिक नेता म्हणून मत दिलं आहे.

बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टनं त्यांचं नवं सर्वेक्षण ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ४१ टक्के मतांसह सातव्या स्थानावर आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ३४ टक्के मतं मिळाली आसून ते तेराव्या स्थानी आहेत. यांच्यासह जगातील २२ मोठ्या नेत्यांची नावं आहेत. संस्थेनं २२ मार्च ते २८ मार्च या कालावधीत हे सर्वेक्षण केलं आहे. त्याची आकडेवारी ३० मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना ६१ टक्के मतं मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ५५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंजचे राष्ट्राध्यक्ष अलेन बारसेट ५३ टक्के मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा ४९ टक्के मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

मॉर्निंग कन्सल्टंटच्या यादीत समाविष्ट २२ देशांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, इटली, जपान, मेक्सिको, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button