झोनल कुस्ती स्पर्धेत झिल तंत्रनिकेतनचे दमदार यश
पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकच्या यजमानपदाखाली भोसरी येथे स्पर्धा संपन्न; १२ तंत्रनिकेतनचा सहभाग, विविध वजन गटांत चुरशीच्या लढती

पिंपरी : इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस् असोसिएशन च्या वतीने आयोजित D1 झोनल कुस्ती स्पर्धेचे यजमानपद पिंपरी-चिंचवड पाॅलीटेक्निक ने भुषविले. स्पर्धेचे आयोजन पै. मारुतीराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, भोसरी याठिकाणी करण्यात आले.
मॅटवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत १२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला.
५७ किलो वजनी गटात राजर्षी शाहु तंत्रनिकेतन ताथवडे च्या श्रेयस शिंदे ने झिल तंत्रनिकेतन च्या प्रणव विर चा पराभव केला.
६१ किलो वजनी गटात झिल च्या अभिमन्यू बानगुडे ने जयहिंद च्या ओम मोरे चा पराभव केला
६५ किलो वजनी गटात झिलच्या आदित्य भारेकर ने समर्थ च्या आयुष रोकडे चा पराभव केला.
७० किलो वजनी गटात भिवराबाई सावंत तंत्रनिकेतनच्या किरण कोळपे ने त्याच काॅलेजच्या सागर घोरपडे चा पराभव केला.
७४ किलो वजनी गटात झिल च्या विश्वजित तोरवे ने पिंपरी-चिंचवड तंत्रनिकेतन च्या दुर्वांकुर लांडगे चा पराभव केला.
८६ किलो वजनी गटात राजगड तंत्रनिकेतनच्या धिरज सारक ने त्याच काॅलेजच्या आयुष विर चा पराभव केला.
९७ किलो वजनी गटात पिंपरी-चिंचवड तंत्रनिकेतनच्या विकून सांगोले ने झिलच्या समीर खुटवड चा पराभव केला.
१२५ किलो वजनी गटात भिवराबाई सांवंत च्या करण ठोंबरे ने कुसरो वाडिया च्या आनंद वाघमारे चा पराभव केला.

या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मा. ज्ञानेश्वर लांडगे (प्रथम महापौर-PCMC, माजी आमदार, संस्थापक अध्यक्ष-पवना सहकारी बँक) मा. महेशदादा लांडगे (आमदार-भोसरी विधानसभा) मा. नरेंद्रशेठ लांडगे (युवा-उद्योजक) यांच्य हस्ते पार पडला.
विविध वजनी गटातील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना मा. नितिनशेठ लांडगे (नगरसेवक, तंत्र संचालक-पवना सहकारी बँक), मा. अमितशेठ गावडे (नगरसेवक), मा. जयनाथ काटे (संचालक-पवना सहकारी बँक), संतोष महाराज लांडगे (सामाजिक कार्यकर्ते), निवृत्ती लांडगे (सामाजिक कार्यकर्ते), सुरेश लांडगे (सामाजिक कार्यकर्ते), राजेंद्र लांडगे (सामाजिक कार्यकर्ते), संतोष मोगदरे (सदस्य-कुस्ती संघटना) यांच्या हस्ते सन्मानपत्र व विजयचिन्ह प्रदान करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रिडा प्रभारित सुनील जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे यांनी मेहनत घेतली. प्राचार्य डाॅ. विद्या बॅकाॅड यांचे मार्गदर्शन लाभले. पंच विजय कुटे, विशाल मोहिते यांनी काम पाहिले. संघ व्यवस्थापक राहुल पवार, योगेश ठाकरे यांनी काम पाहिले.




