ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
मांडूळ विक्री प्रकरणी तरुणाला अटक
![Youth arrested in forehead sale case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Mandul-snake.jpg)
पुणे | विक्रीसाठी मांडूळ बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) सायंकाळी साडेसातच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे करण्यात आली.
योगेश मारेआप्प म्हेत्रे (वय 21, रा. आनंद नगर, चिंचवड), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वनविभागाचे वनरक्षक सुरेश काशिनाथ बरले (वय 30, रा. भांबुर्डा, गोखले नगर, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मांडूळ जातीचा सरपटणारा प्राणी विनापरवाना विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 15 लाख रुपये किंमतीचे मांडूळ मिळून आले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
भोसरी पोलीस तपास करीत आहेत.