तलवार बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/arrest-0-1.jpg)
पिंपरी चिंचवड | परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) मध्यरात्री दीड वाजता खराबवाडी येथे करण्यात आली.आकाश देवदास गहलोत उर्फ राजवीर सिंग (वय 26, रा. खराबवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक युवराज बिराजदार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश त्याच्या घराजवळ तलवार घेऊन थांबला आहे. तो परिसरात दहशत निर्माण करणार आहे, अशी माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलोसांनी परिसरात सापळा लावून आकाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 100 रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे.
आकाश विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), 135, आर्म ऍक्ट 4 (25) नुसार गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिसांनी त्याला अटक केली असून यासंदर्भात आणखी तपास करीत आहेत.