पिंपरी / चिंचवड
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी l प्रतिनिधी
पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. १८) दुपारी साडेचार वाजता रावेत येथे करण्यात आली.
मोनेश देवेंद्र नाटेकर (वय २३, रा. रावेत) असे तर्क केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण मुळूक यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील रमाबाईनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मोनेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज मिळाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.