पिंपरी / चिंचवड

ओटास्कीम येथे गुटख्याची वाहतूक करताना तरुणाला पकडले : 36 हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

ओटास्कीम, निगडी येथे एक तरुण गुटख्याची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून अटक केली. त्याच्याकडून 36 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 27) सकाळी साडेसात वाजता करण्यात आली.

इस्माईल अल्लाबक्ष भाटघर (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह नितीन हिरालाल छाजेड (वय 56, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अतुल लोखंडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आरोपी भाटघर हा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी सकाळी भाटघर हा त्याच्या दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी सकाळी साडेसात वाजता कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 80 हजारांची एक दुचाकी आणि 36 हजार 447 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button