जबरी चोरी, तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक
![Young man arrested for burglary](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/arrest-0-1.jpg)
पिंपरी चिंचवड | कोयत्याच्या धाकाने तरुणाच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर परिसरातील कारची तोडफोड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना थोरात नगर, रामनगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. 21) मध्यरात्री घडली.अक्षय अर्जुन माने (वय 21, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनिल रामचंद्र सुभाष साळुंके (वय 26, रा. थोरात कॉलनी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी माने याने थोरात नगर येथे येऊन फिर्यादी अनिल यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्या खिशातील रक हजार 200 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या कारची काच फोडून नुकसान केले. तसेच परिसरातील इतर कारच्याही काचा आरोपी माने याने फोडल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.