पिंपरी / चिंचवड
पोलीस असल्याचे सांगून तरुणाचे अपहरण
पिंपरी l प्रतिनिधी
चाकण पोलीस चौकीचे पोलीस असल्याचे सांगून दोघांनी एका तरुणाचे अपहरण केले. हा प्रकार बुधवारी (दि. 20) सायंकाळी सात वाजता महाळुंगे येथे घडली.
दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अनोळखी व्यक्तींनी 26 वर्षीय तरुणाचे अपाहन केले असून अपहृत तरुणाच्या चुलत भावाने चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथील एका सलून दुकानात फिर्यादी यांचा चुलत भाऊ असताना दोघेजण तिथे आले. ‘आम्ही चाकण पोलीस चौकीचे पोलीस आहे’ अशी बतावणी करून फिर्यादी यांच्या चुलत भावाला कारमध्ये बसवून नेले. आरोपींनी अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरण केले असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.