TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांनी उद्योग क्षेत्राकडे वाटचाल करावी

“नारी उद्योगिका २०२२” कार्यक्रमात महिला उद्योजकांचा सूर

पिंपरी चिंचवड | महिलांनी रोजगाराच्या मागे न धावता उद्योगांच्या संधी शोधून नव संकल्पना आत्मसात करत उद्योग क्षेत्राकडे वाटचाल करावी, असा सूर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित “नारी उद्योजिका २०२२” कार्यक्रमात मान्यवरांनी मांडला. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर (पीसीएसआयसी) यांच्यावतीने “नारी उद्योजिका २०२२” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, महिला उद्योजकांनी आपल्या उद्योग क्षेत्रातील कामगिरीबाबत मत व्यक्त् करतांना उपस्थ‍ित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच, स्मार्ट सिटीच्या वतीने महिला दिनानिमीत्त केक कापून महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अध‍िकारी निळकंठ पोमण, वित्तीय अध‍िकारी सुनील भोसले, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, कंपनी सेके्रटरी चित्रा पंवार, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मसारे यांच्यासह महिला उद्योजिका उपस्थ‍ित होत्या. सदर कार्यक्रमामध्ये चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ४५ महिला उद्योजिका यांनी सहभाग घेतला. “ब्रेक द बायस” या थीमवर आधारीत “नारी उद्योगिका २०२२” कार्यक्रम घेण्यात आला.

प्रसंगी, वक्त्यांनी मार्गदर्शन करताना महापालिका व महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी असलेल्या योजना व स्टार्टअपविषयी माहिती दिली. डॉ. सारिका वैद्य यांनी महिला उद्योजकांना आरोग्याचे महत्त्व विषद केले. मेजर पूनम यांनी महिलांनी स्त्री असल्याचा अभिमान बाळगा, असे सांगितले. उज्वला गोसावी यांनी महिला उद्योजकांसाठी नवोपक्रमाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. हॅपीनेस प्रशिक्षक शैलजा केदारी यांनी आनंदी कसे राहावे, याबाबत अनुभव मांडला. डॉ. गोस्वामी यांच्यासह उपस्थ‍ितांनी आपले अनुभव कथन केले. पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरने नव महिला उद्योजकांची संख्या ५ टक्केवरून २०टक्कांवर नेली असून महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर नेहमीच कार्यरत आहे, असे उदय देव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button