गुटखा विक्री प्रकरणी महिलेला अटक
![Woman arrested for selling gutkha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/gutkha-1.jpg)
पिंपरी चिंचवड
गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) रात्री मोहननगर, बाणेर येथे करण्यात आली.
रमेश (रा. कोथरूड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस शिपाई मनोज गोसावी यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर बाणेर येथील बीटवाईज कंपनीसमोर दोघेजण गुटखा विक्रीसाठी आले असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 32 हजार 55 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. आरोपी गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.