Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘जुन्या नव्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार’; शत्रुघ्न काटे

काटे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदाचा पदभार

पंधरा दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर करणार*

पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणुका ताकदीने लढवल्या जातील. पक्षात कोणाचीही नाराजी नाही. शहरातील आमदार आणि माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करेल. पक्षात दूजाभाव होणार नाही याची दक्षता घेऊन पुढील पंधरा दिवसांच्या कालावधीत कार्यकारिणी गठित केली जाईल,” असे भाजपा नवनियुक्त शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले.

भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे यांनी गुरुवारी अधिकृतपणे शहराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या समारंभात, पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक निरीक्षक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते मावळते शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून त्यांनी हे पद स्वीकारले.

यावेळी शत्रुघ्न काटे म्हणाले, पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्यावर भर राहील. शहरातील 4500 सक्रिय सदस्य आणि 3 लाख प्राथमिक सदस्यांच्या सहकार्याने संघटन वाढविण्याचे काम करणार असून, जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य राहील. गेल्या तीन वर्षांपासून जनतेची कामे निरंतर सुरू असल्याचे काटे यांनी नमूद केले.

मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. यावेळी, आमदार महेश लांडगे म्हणाले, “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल.”आमदार उमाताई खापरे म्हणाल्या की, “शत्रुघ्न काटे यांच्या अनुभवाचा संघटनेला निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार अमित गोरखे म्हणाले ; “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक गतिमान होईल.”माजी आमदार अश्विनी जगताप शुभेच्छा देत म्हणाल्या; “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.”

हेही वाचा –  प्रियदर्शनी शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल

याप्रसंगी आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, महेश कुलकर्णी, चंद्रकांत नखाते, संतोष कलाटे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, राहुल जाधव, मनोज तोरडमल, सरचिटणीस संजय मंगोडेकर, विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, काळूराम बारणे, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नितीन लांडगे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, राजेंद्र गावडे, हर्षल ढोरे, विकास डोळस, सागर गवळी, हर्षल ढोरे, संदीप कस्पटे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, शारदा सोनवणे, उपाध्यक्ष कैलास सानप, बिभीषण चौधरी, प्रदेश सदस्य कविता हिंगे, जयनाथ काटे, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, गणेश ढोरे, सनी बारणे, ॲड. हर्षल नढे, मोहन राऊत, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, गणेश वाळुंजकर, ॲड. योगेश सोनवणे, रामदास कुटे, योगेश सोनवणे, अमोल डोळस, शिवराज लांडगे, संकेत चोंधे, राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, योगेश चिंचवडे, दीपक भोंडवे, विजय फुगे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, पल्लवी मारकड, डॉ. तृप्ती परदेशी, नामदेव पवार, मधुकर बच्चे, गणेश आर. ढाकणे, देविदास पाटील, देवदत्त लांडे, जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे, दत्ता यादव, चैतन्य देशपांडे, अभिजित बोरसे, देविदास साबळे, कुणाल लांडगे, गणेश वाळुंजकर, आदेश नवले, खंडूदेव कथोरे, दत्ता ढगे, प्रीती कामतीकर, सुप्रिया चांदगुळे, राजश्री जायभाय, गीता महेंदू, आशा काळे, सीमा चव्हाण, रोहिणी रासकर, पुष्पा सुबंध, अंतरा देशपांडे, दिपाली कलापुरे, शोभा भराडे, पोपट हजारे, प्रदीप बेंद्रे, भूषण राऊत, आनंद देशमुख, सचिन राऊत, संजय पटनी, विजय शिनकर, बबन डांगले, अर्जुन ठाकरे, दत्ता गव्हाणे, मनोज ब्राह्मणकर, कीर्ती परदेशी, कोमल शिंदे, प्रतिभा जवळकर, मनिषा शिंदे, सागर फुगे, डॉ. प्रताप सोमवंशी, सीमा बोरसे यांच्यासह शहरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button