breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद!

महापालिका प्रशासनाचे रहिवाशांना आवाहन

पाणी काटकसरीने वापरा, प्रशासनाला सहकार्य करा

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील निगडी याठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे तसेच शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवारी ३० मे रोजी पिंपरी चिंचवड शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने निगडी, सेक्टर क्र. २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे यासह शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी ३० मे २०२४ रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

हेही वाचा    –    Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एक तासाचा ब्लॉक 

तसेच सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार ३१ मे २०२४ रोजी सकाळी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाणी वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button