breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona : कोरोनावरील नियंत्रणासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सैन्य दलाचे प्रोत्साहन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाला हरविण्यासाठी व कोविड-19 वर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी योग्य नियोजनाद्वारे अंमल बजावणी करणाऱ्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स च्या आदेशानुसार कर्नल सुब्रतो गोस्वामी यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये येऊन भारतीय सैन्य दलाच्या वतीने रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचारी ह्यांच्याशी संवाद साधला.

भारतीय सैन्य दलाचे प्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष रुग्णालयात येऊन केक आणि मिठाई याचे वाटप करून या कोरोना युद्धात आपण एकटे नसून भारतीय सेना आपल्या सोबत आहे याची ग्वाही दिली. ह्या ह‌दयस्पर्शी भेटीमुळे रुग्णालयात सेवा करत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनोबल वाढविले. या कार्यक्रमास पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे तसेच अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. वर्षा डांगे तसेच रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. अभयचंद्र दादेवार डॉ. मनजीत संत्रे, महादेव बोत्रे सामाजिक कार्यकर्ता, परिचारिका विभागाच्या निगडे, तसेच रूग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सेनादलाच्या प्रोत्साहनामुळे वाय.सी.एम. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य व उत्साह निर्माण झाला आहे. शेवटी ज्या प्रमाणे भारतीय सेना सीमेवर लढून या भारत देशाची सेवा करतात अगदी त्याचप्रमाणे आम्ही आपला वारसा घेऊन या रुग्ण सेवा करू आणि खरोखरच आपल्या या रुग्णालयातील भेटीमुळे रुग्णालयातील सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी रुग्णालयाच्या वतीने सैन्यदलाचे आभार व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button