breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: सुनील… तुम्ही संकट उंबरठ्यावरच रोखले..!; मावळातील उपक्रम संपूर्ण राज्यात पथदर्शी : खासदार श्रीरंग बारणे

– वडगाव मावळ येथे लोकप्रतिनिधी- प्रशासकीय अधिकारी बैठक

– कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांचा घेतला आढावा

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुला मावळ तालुक्यातील नागरिकांनी उंबरठ्यावरच रोखले. तालुक्याच्या हद्दीलगत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश ‘रेड झोन’मध्ये आहे. मात्र, आमदार सुनील शेळके  आणि  प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन करुन तालुक्याला कोरोनापासून आतापर्यंत दूर ठेवले, असे मत मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

          वडगाव मावळ येथे पंचायत समिती सभागृहात खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजना याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पवार, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती बाबुराव वायकर, पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजू खांडभोर  यांच्यासह पदाधिकारी व सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

          खासदार बारणे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मावळ तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. सुनील…. तुम्ही कोरोनाच्या संकटाला उंबरठ्यावरच रोखले आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये सकारात्मक समन्वय आहे. आमदार सुनील शेळके यांनी सोशल डिस्टंसिंग, मदत नव्हे कर्तव्य उपक्रम, अन्नछत्रालय, जनजागृती, पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट अशा प्रकारचे विविध उपक्रम संपूर्ण राज्यात पथदर्शी ठरतील असे राबवले आहेत.

घाबरु नका…जागरूक रहा : आमदार सुनील शेळके

आमदार सुनील शेळके म्हणाले की, जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून कोरोनाचा शिरकाव आपल्या मावळ तालुक्यात होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनासदृश रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जागरुक राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार शेळके यांनी केले. तसेच, लोणावळा नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचीही कामगिरी उल्लेखनीय आहे, अशा भावना शेळके यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button