breaking-newsपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : आंबेगावमधील लांडेवाडी ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण कक्ष

आंबेगाव । महाईन्यूज । प्रतिनिधी

लांडेवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्‌घाटन शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती सरपंच अंकुश लांडे यांनी दिली. किराणामाल, भाजीपाला इत्यादी अत्यावश्‍यक वस्तू घेण्यासाठी येणारे ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, तसेच शासकीय कर्मचारी यांच्यासाठी हा कक्ष कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. नागरिकांनी शक्‍यतो घराच्या बाहेर पडू नये.

अत्यावश्‍यक सेवेसाठी बाहेर पडलात, तर निर्जंतुकीकरण कक्षातून प्रवेश करून घरी जावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. सरपंच अंकुश लांडे, उपसरपंच उत्तम गुंजाळ, ग्रामविकास अधिकारी आर. आर. भुसूम, आपत्ती व्यवस्थापन समितीतील सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button