breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona: आंतरजिल्हा प्रवासाकरिता पोलिसांकडून ई-पासची सुविधा

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

अत्यंत तातडीच्या कारणासाठी आंतरजिल्हा प्रवासाकरिता पोलिसांकडून ई-पासची सोय देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पासकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. सदर काळात वैद्यकीय अथवा मृत्यू अथवा इतर अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून महाराष्ट्रातील इतर जिल्हयात जाण्यासाठी ई-पास उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याकरीता नागरिकांनी आंतरजिल्हा प्रवासासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस येथे स्वतः रजिस्टर होणे गरजेचे आहे. आवश्यक ते कागदपत्र व फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरताना अत्यावश्यक सेवा कारण/उद्देश येथे आपला आंतरजिल्हा प्रवास करण्याचा उद्देश स्पष्ट लिहिणे गरजेचे आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवास प्रारंभ ठिकाण व प्रवासाचे अंतिम ठिकाणही लिहीणे अत्यावश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधितांना टोकन दिले जाईल. हे टोकन जपुन ठेवल्यास आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यास मदत होणार आहे.पोलीसांकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच ई-पास दिला जाईल किंवा नाकारण्यात येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास वेबसाईटवरूनच आपला ई-पास डाऊनलोड करावा.

 ई-पास मिळाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधितांनी प्रवासात जवळ ठेवावी. पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी मागितल्यानंतर ती प्रत दाखवावी. सदरचे ई-पास हे फक्त आंतरजिल्हा प्रवासासाठीच ऑनलाईन मिळतील. पिंपरी चिंचवड व पुणे येथे जाण्या-येण्यासाठी लागणारे अत्यावश्यक अंर्तगत पास हे वरील वेबसाईटवर अर्ज करून दिले जाणार नाहीत. सदरची वेबसाईटचा वापर फक्त आंतरजिल्हा ई – पास मिळणेसाठीच आहे.

पिंपरी चिंचवड व पुणे येथे जाण्या – येण्यासाठी लागणारे अत्यावश्यक अंर्तगत पास हे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, व पोलीस उपायुक्त परिमंडळ २ येथे मिळतील. परिमंडळ १ साठी [email protected] किंवा मो. क्र. 9834957526 यावर योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज करावा. तसेच परिमंडळ २ साठी [email protected] किंवा मो. क्र. 9529861471 यावर योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज करावेत.

 आंतरराज्यीय प्रवासासाठीचे पास हे पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड येथून दिले जाणार नाहीत. आंतरराज्यीय प्रवासासाठी योग्य त्या कारणांसह आपले अर्ज covid19mpass @ gmail . com – या ई – मेल आयडी वर करावेत. सदरचे पास हे पोलीस महासंचालक कार्यालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई येथून दिले जातात, असे सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button