breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माथाडी कामगार व टाटा ग्रुप ऑफ कंपनी व्यवस्थापनात वेतन करार!

कामगार नेते इरफान सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार

पिंपरी-चिंचवड | शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटना आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, तथा शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा वेतन वाढ करार नुकताच करण्यात आला.

शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना 5 हजार 250 रुपयांची घसघशीत पगारवाढ लागू करण्यात आली. ही पगारवाढ जुलै 2024 या महिन्याच्या पगारामध्ये समाविष्ट देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा  :  सोनं व चांदी खरेदी करायचा विचार करताय? तर जाणून घ्या आजचे दर 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

वेतनात भरघोस वाढ झाल्यामुळे कामगारांनी इरफान सय्यद यांचा युनियनच्या कार्यालयात सत्कार केला . कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, जनरल सेक्रेटरी प्रवीण जाधव, संघटक प्रदीप धामणकर , मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग कदम, रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश कंठाळे, गोरक्ष दुबाले, श्रीकांत मोरे,बबन काळे,सुनील सावळे, अशोक साळुंके, नागेश व्हनवटे, समर्थ नायकवडे, विश्वनाथ गांगड, अमित पासलकर, रत्नाकर भोजणे, गणेश नाईकवाडे, आयुष शिंदे तसेच माथाडी मंडळातील टाटा ऑटो कॅम्प सिस्टीम लिमिटेड चिंचवड मुकादम केशव रासकर, मुकादम गिरीश देशमुख, विजय खंडागळे, टी एम ऑटोमॅटिक सिस्टीम चिंचवड मुकादम गणेश पिंपरे, टॅको हॅन्ड्रीक्सन चाकण, मुकादम सचिन नाळे, टाटा ऑटो कॉम सिस्टम हिंजवडी मुकादम स्वामी गंगाधर, भोसरी मुकादम प्रताप खाडे कामगार सुमित पाठारे, दौलत पवार, प्रदीप डफळ, विशाल कांबळे, दीपक शेळके, सिद्धेश्वर फाटक, प्रसाद शिंदे,संदीप धायरकर, दिलीप तेलंगे,शंकर स्वर्गेकर, आप्पासाहेब नवले,नामदेव जाधव, तसेच माथाडी कामगार व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमधील चर्चेने विषय सोडविण्याचे काम संघटना करीत असते . यापुढील काळातही कामगार व प्रशासनाने बरोबर राहून कंपनीचे व कामगारांचे हित जपावे. महाराष्ट्र मजूर संघटना ही हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन निर्माण झालेली संघटना आहे. कामगार हिताचे बाळकडू प्यायलेली ही संघटना केवळ कामगारांचे हित जपण्यातच धन्यता मानते. त्यामुळे कष्टकरी कामगार हे संघटनेकडे आपलेपणाने पाहतात.

– इरफान सय्यद, उपनेते, शिवसेना.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button