पुणे सायक्लोथॉनमध्ये मतदार जनजागृती अभियान
![Voter Awareness Campaign in Pune Cyclothon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/IMG-20211114-WA0022-1.jpg)
पिंपरी चिंचवड | निगडी येथे झालेल्या पुणे सायक्लोथॉनमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.सायक्लोथाॅन मोहिमेचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सुनील शेट्टी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित होते.भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.रविवारी (दि. 14) पुणे सायक्लोथाॅन मोहिम पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आली. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुक विभागाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली.
1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी व पुनरिक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.