breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

न्याय हक्कांसाठी सोसायटीधारकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

महास्नेह संमेलनाला १५ हजाराहून अधिक गर्दी; समस्या, आव्हांनावर मात करण्यासाठी वज्रमूठ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महास्नेहसंमेलनाला तब्बल १५ हजारहून अधिक सदनिकाधारकांनी सहभाग घेतला. या संमेलनामध्ये पायाभूत सोयी-सुविधांसाठी भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हांनावर उहापोह करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता सोसायटीधारकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळाले.
चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने महास्नेहसंमेलन भरवण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, सोसायट्यांचे हे महास्नेहसंमेलन घेण्या पाठीमागचा उद्देश सांगत असताना पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांना एका छताखाली आणून, सर्वांना एकसंघ करून सरकारी यंत्रणा आणि आपल्या सर्व प्रस्थापितांना आपली ताकद दाखवणे गरजेचे होते म्हणून असे एकत्रित महास्नेहसंमेलन घेणे गरजेचे होते. सोसायटी फेडरेशनचा जन्मच सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोसायटी धारकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी झालेला आहे. आमचे फेडरेशन समाजकारण करते सोसायट्यांसाठी काम करते कोणतेही राजकारण करत नाही.

हेही वाचा  –  देशात वाढतायत कोरोनाचे नवीन रूग्ण, एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

सोसायटी फेडरेशन अराजकीय..

फेडरेशन हे अराजकीय काम करते फेडरेशन कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा पक्षाला बांधील नाही फेडरेशन हे कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची भूमिका किंवा त्याला समर्थन करत नाही असेही सांगळे यांनी सांगितले. मात्र, पण जे जे राज्यकर्ते जे स्थानिक पदाधिकारी आपल्याला मदत करतात त्यांना त्यांचा पक्ष न बघता त्यांचे आपण समर्थन करतो जसे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्यासारख्या राजकीय व्यक्तींना समर्थन करतो सपोर्ट करतो. कारण आजपर्यंत जी, जी काम आपण आमदार महेश लांडगे यांना सांगितली ती सर्व काम त्यांनी पूर्ण केलेली आहेत त्यामध्ये ओला कचरा उचलने असेल, पाण्याची समस्या असेल, राज्याच्या अधिवेशनामध्ये सोसायटी धारकांचे प्रश्न मांडने असेल, सोसायटीच्या जवळ होणारे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हटवणे असेल, असा अनेक मुद्यांवर आमदार लांडगे यांनी सहकार्य केले. त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो, असा दावाही सांगळे यांनी केला.

मी सोसायटीधारकांच्या सोबत – आमदार महेश लांडगे

आमदार महेश लांडगे यांनी त्यांची भूमिका मांडताना सोसायटी फेडरेशन हे अराजकीय आहे. परंतु, सोसायटी फेडरेशनच्या कुठल्याही कामांमध्ये कोणत्याही प्रकारची माझी मदत लागत असेल तर ती मी पूर्वीपासून करत आलेलो आहे आणि पुढे देखील करणार आहे. सोसायटी फेडरेशनला कोणी वैयक्तिक त्रास देत असेल बिल्डर असतील ,स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी असतील किंवा इतर कोणी असेल असे कोणी सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देत असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे कुणालाही घाबरायची गरज नाही अशी ठाम भूमिका आणि समर्थन आमदार महेश लांडगे यांनी दिले.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या लोकसंख्येमध्ये ७० टक्के लोकसंख्या ही सोसायटीधारकांची आहे. सोसायटीधारकांना एका छत्राखाली आणणे आणि आपला एक दबाव गट तयार करून प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा प्रस्थापित असतील त्यांना दखल घेण्यास भाग पडणे हा आजच्या महास्नेहसंमेलन मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. लोकांचा हा प्रतिसाद पाहता आमचा हा उद्देश साध्य झाला आहे, असे आम्हाला वाटते. प्रत्येक गोष्टीमध्ये आमचे मत आमचा विचार घेऊनच शहराच्या विकासाचे राजकारण किंवा समाजकारण करावे लागेल. सोसायटीधारकांमध्ये निर्माण केलेली ही चळवळ अशीच पुढे चालू राहील आणि एकसंघपणे सर्वांना एकत्र करून सोसायटी धारकांच्या समस्यासाठी फेडरेशन ठामपणे सोसायटी धारकांच्या पाठीशी राहील.

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button