रांगोळी स्पर्धेदरम्यान कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/WhatsApp-Image-2021-03-31-at-15.20.24.jpeg)
- प्रभाग दोनमध्ये शिवजयंतीनिमित्त घेतल्या स्पर्धा
पिंपरी / महाईन्यूज
जाधववाडी- प्रभाग दोनमधील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते विशाल आहेर यांनी शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र, या स्पर्धा घेत असताना प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड-19 च्या नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने, अनेक युवा कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रम प्रभागात राबविले जात आहेत. शहरात कोविड-19 चा उद्रेक वाढला असतानाही, येत्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
प्रभागातील नागरिकांसाठी आपण कसे कार्य करतो हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यामध्ये कोविड-19 बाबात प्रशासनाने घातलेले नियमही पायदळी तुडवले जात आहेत. आहेर यांनी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धे दरम्यान एकाही स्पर्धकांच्या तोंडाला मास्क अथवा सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आला नाही. या स्पर्धेदरम्यान फोटोसेशन कऱण्यात आले. यावेळी प्रशासनाने घातलेल्या नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र दिसून आले.