breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार विनयकुमार चौबे यांनी स्वीकारला!

पिंपरी: पिंपरी-चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त म्हणून अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (दि. १४) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबत मंगळवारी रात्री आदेश दिले होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिशा’ उपक्रम राबविला. तसेच बेसिक पोलिसिंगवर भर दिला. त्यात कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वतः लॉटरी सेंटरवर कारवाई केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नियंत्रण कक्ष येथे संलग्न केले.

दरम्यान, मंगळवारी रात्री अंकुश शिंदे यांची बदली होऊन विनय कुमार चौबे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. चौबे यांनी बुधवारी सायंकाळी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.सन २०२० मध्ये विनय कुमार चौबे यांना अपर पोलीस महासंचालक पदी बढती मिळाली आहे. मुंबई येथे अनेक वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत होते. तिथून त्यांना पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. चौबे हे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आयआयटी कानपुर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. शहराला मिळालेले ते पाचवे पोलीस आयुक्त आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button