विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देत वृक्षदिंडी उपक्रम व वन भोजनाचा लुटला आनंद….
राक्षेवाडी येथील गायरानावर वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमाचे आयोजन
![Vidyaniketan, school, social, message, tree shedding, activities, forest, food, anand, rakshawadi, cow shedding, plantation, rearing, programs, organizing,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/urakshropan-780x470.jpg)
चाकणः येथील श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन शाळेत, दि. २० जुलै २०२४ रोजी वृक्षदिंडी, वृक्षारोपण व वनभोजन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष मा. शामरावजी देशमुख व रोहिणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व चाकण नगरपरिषदेच्या सहकार्यने वृक्षारोपण व संगोपन या कार्यक्रमाचे आयोजन राक्षेवाडी येथील गायरानावर करण्यात आले.
![Vidyaniketan, school, social, message, tree shedding, activities, forest, food, anand, rakshawadi, cow shedding, plantation, rearing, programs, organizing,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-21-at-9.19.21-PM-169x300.jpeg)
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास इ. ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चाकण नगरपरिषदेचे विजय भोंडवे, प्रियांका राऊत तसेच राक्षेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कौटकर, आत्माराम कौटकर, बाळासाहेब वाडेकर या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनी ‘वृक्ष-निसर्गाची मौल्यवान भेट’ या विषयाचे महत्त्व सांगून उपक्रमाला सुरुवात झाली. नगरपरिषद व राक्षेवाडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षदिंडीची सुरुवात शाळेच्या मैदानातून झाली. या दिंडीत विद्यानिकेतनचे प्राचार्य दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, समन्वयक व कर्मचारी या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण राक्षेवाडी गावातून वृक्ष दिंडी काढली व गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पर्यावरण पुरक घोषणा देण्यात आल्या. शाळेच्या आवारात व गायराण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तुळशीची व इतर विविध प्रकारची रोपे व बीया शालेय परिसरात लावण्यात आल्या. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सोमनाथ हात्तुरेसर यांनी केले तर आभार माधुरी घौडेकर यांनी व्यक्त केले.