Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडपुणे
पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड
![Vehicles vandalized once again in Pimpri-Chinchwad city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Pimpri-Chinchwad-city-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना घडली आहे. अज्ञात तिघांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे चारच्या सुमारास चिखली परिसरातील सरस्वती शाळेजवळ ८ ते १० वाहनांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तीन जणांनी चिखलीतील सरस्वती शाळेजवळ पार्क केलेल्या वाहनांना लक्ष करत वाहनांची तोडफोड केली. यात रिक्षा, कार, टेंपो, आशा विविध वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हातात कोयते घेऊन तिघांनी हुल्लडबाजी करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. आशा पध्दतीने गुंडांनी दहशत माजवून एक तर्फे पोलिसांना आव्हानच दिले आहे. निगडी पोलिस या वाहनांची तोड फोड करणार्या आरोपींचा शोध घेत आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Pimpri-Chinchwad-city-1024x576.jpg)