ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वेदांता हौसिंग सोसायटीत ‘मी कोण आहे?’
भगवत गीतेवरील एक पात्री प्रयोग उत्साहात
पिंपरीः वेदांता हौसिंग सोसायटीध्ये भगवत गीतेवर आधारित एक पात्री प्रयोग “मी कोण आहे?” यशस्वीरीत्या पार पडला. या एका तासाच्या प्रयोगात संपूर्ण भगवत गीतेचा सार श्री. रामकृष्ण पालमकर यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केला.
या प्रयोगात भगवत गीतेतील शिकवणींवर आधारित अनेक विचार मांडण्यात आले, ज्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. वेदांत सोसायटीतील अनेक सदस्यांनी या प्रयोगाचा लाभ घेतला आणि श्री. पालमकर यांच्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम, वेदांता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे , सुमंत देशपांडे, मदन पाटील आणि समीर राव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.