विविध समाजोपयोगी उपक्रमांनी एस. बी. पाटील यांचा वाढदिवस साजरा
![Various socially useful activities B. Patil's birthday celebration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/WhatsApp-Image-2021-10-22-at-2.50.44-PM.jpeg)
- आरोग्य तपासणी शिबीर , ‘वटवृक्ष’ पुस्तकाचे उद्घाटन
पिंपरी | प्रतिनिधी
आरोग्य तपासणी शिबीर, मोफत कोरोना लसीकरण ,शाळेच्या प्ले ग्रुप वर्गाचे उद्घाटन यासह अन्य विविध उपक्रमांनी एसएसपी शिक्षण संस्थेचे संस्थापक व नामांकित बांधकाम व्यवसायिक एस. बी. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेच्या नेवाळे वस्ती, चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल व सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात संस्थापक पाटील यांच्या जीवनकार्याच्या माहितीवर आधारित ‘वटवृक्ष’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्यासह अन्य नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संस्थेचे संचालक गणेश पाटील, आकाश पाटील मंगेश पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रकाश गायकवाड,सुनील शेवाळे, बाजीराव नेवाळे, गणेश मळेकर , अँड अशोक वाघ, अँड.साने ,डॉ. प्रवीण साबळे, मुख्याध्यापिका अग्नेस मस्करेहान्स , प्राचार्य डॉ. प्रवीण साबळे, उपमुख्याध्यापिका प्रिया नेवाळे , सतिश शेळके यांच्यासह अन्य शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान दापोडी येथील गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी नगरसेविका स्वाती काटे , युवा उद्योजक विश्वनाथ पाटील,प्रल्हाद काटे ,युवा उद्योजक संतोष काटे,रितू गुळवणी ,प्राचार्य दत्तात्रय घारे, नंदकुमार कणसे, दीपक काटे,मुख्याध्यापिका जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते ‘वटवृक्ष’ या पाटील यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना एस. बी. पाटील म्हणाले, गोरगरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने शिक्षण संस्थेची स्थापना केली. सर्व ठिकाणच्या शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षकांच्या मेहनतीमुळे शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवता याचे समाधान वाटते. सर्वांना सोबतीला घेऊन विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न राहिला आहे. दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एस बी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
![Various socially useful activities B. Patil's birthday celebration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/WhatsApp-Image-2021-10-22-at-2.50.44-PM-300x200.jpeg)