breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्या लसीकरण केंद्र सुरू ; 45 वर्षापुढील नागरिकांना मिळणार पहिला आणि दुसरा डोस

पिंपरी / महाईन्यूज

शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवारी (दि. २२) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर ‘कोविशिल्ड’ व  ‘कोव्हॅक्सिन’ लस ४५ वर्षापुढील नागरिकांना देण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. तसेच, ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या शनिवारी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे.

 

अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव वयोगट कोविशिल्ड लस पहिला व दुसरा डोस लाभार्थी क्षमता  
यमुनानगर रुग्णालय  वय वर्षे ४५ पुढील १००  
तालेरा रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००  
सावित्रीबाई फुले शाळा भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००  
नवीन जिजामाता रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००  
आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ वय वर्षे ४५ पुढील १००  
खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव वय वर्षे ४५ पुढील १००  
नवीन आकुर्डी रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००  
कासारवाडी दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००  
         
  अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव वयोगट कोव्हॅक्सिनलस फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता

 

  नविन भोसरी रुग्णालय  वय वर्षे ४५ पुढील १००
  आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ वय वर्षे ४५ पुढील १००
  यमुनानगर रुग्णालय  वय वर्षे ४५ पुढील १००
  तालेरा रुग्णालय  वय वर्षे ४५ पुढील १००

तसेच वरील लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button