Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाहतूक नियोजनासाठी आता ‘शहरी दळणवळण विभाग’

स्वतंत्र विभागास मान्यता : सहशहर अभियंत्यासह 14 पदांची निर्मिती

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाच्या कार्यपद्धतीत बदल करून आता ‘शहरी दळणवळण विभाग’ असे नामकरन करण्यात आले आहे. तसेच, हा संपूर्ण विभाग स्वतंत्र करण्यात येत असून नवीन पदनिर्मिती व सेवाप्रवेश नियमात बदल केले आहेत. विभागासाठी एका सहशहर अभियंत्यासह अभियांत्रिकी पदांसह नव्याने 14 पदे निर्माण करण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील वाहतूक नियोजन विभागाच्या नावात बदल व वाहतूक नियोजन विभागासाठी नवीन पदनिर्मिती व सेवाप्रवेश नियमात बदल करण्याबाबत शासनाच्या नगर विकास विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिली आहे. त्या प्रमाणे प्रस्ताव प्रशासक सिंह यांनी मंजूर केला. या निर्णयानुसार महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभाग’ ऐवजी ‘शहरी दळणवळण विभाग’ असे करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ पासून शहरी दळणवळण विभागाकरीता आवश्यक अर्थसंकल्पीय तरतुद स्वतंत्र दर्शविण्यात येईल.

हेही वाचा     –        अधिवेशनात शहरातले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न; आमदार अमित गोरखे 

सहशहर अभियंता (स्थापत्य) या पदाच्या पदोन्नतीसाठी असलेल्या नेमणुकीच्या अर्हतेमधून कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन) ही अर्हता वगळण्यात आली आहे. यासह सहशहर अभियंता (दूरसंचार) पदाचे पदनामामध्ये सहशहर अभियंता (शहरी दळणवळण विभाग) असा बदल करण्यात आलेला आहे. सहशहर अभियंता (शहरी दळणवळण विभाग) हे पद शासन मंजूर नियुक्तीच्या निकषानुसार भरले जाणार आहे. यासोबतच या विभागासाठी स्वतंत्र अभियांत्रिकीअधिकारी, कर्मचारी यांच्या पदांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे.शहरी दळणवळणासाठी १४ पदे मंजूर करण्यात आली आहे.

शहरी दळणवळण विभागासाठी सुधारीत आकृतिबंध मंजूर

महापालिकेतील या शहरी दळणवळण विभागासाठी सुधारीत आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये एक सहशहर अभियंता (शहरी दळणवळण), कार्यकारी अभियंता, २, उपअभियंता ३, कनिष्ठ अभियंता ८ यांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत विभागासाठी नऊ पदे अस्तित्वात असून, नव्याने चार पदे निर्माण करून भरावी लागणार आहेत.

महापालिकेत सद्यस्थितीत स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, पाणीपुरवठा, जलःनिसारण, पर्यावरण अभियांत्रिकी, स्थापत्य (क्रीडा व उद्यान), विद्युत, नगररचना हे अभियांत्रिकी विभाग अस्तित्त्वात होते. आतापर्यंत वाहतूक नियोजन हे स्थापत्य प्रकल्प विभागाअंतर्गत सुरू होते. परंतु, शहरी दळणवळण हा स्वतंत्र विभाग केल्याने आता अभियांत्रिकी विभागात आणखी एका विभागाची भर पडली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button