पिंपरी / चिंचवड

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने एका दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 12) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे घडला.

प्रमोद नंदु चव्हाण (वय 23) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी सुनील अरुण हिरे (वय 28, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज संपत शेंडगे (वय 32, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमोद चव्हाण हा त्याच्या दुचाकीवरून हिंजवडी फेज तीन येथून जात होता. टीएसजी सोसायटी समोर आला असता त्याला आरोपी सुरज शेंडगे याच्या पिकअपने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रमोद याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पिकअप चालक सुरज याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button