घरफोडी करून दोन लाख 75 हजारांचे दागिने पळवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/theft.jpg)
बावधन येथील घटना
पिंपरी l प्रतिनिधी
कुलूप लावून बंद घराचा कडी कोयंडा उचकटून लोखंडी कपाटातून दोन लाख 75 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना एमएलडी गार्डनच्या बाजूला बावधन खुर्द येथे 15 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत घडली.
अमेय प्रदीप जोशी (वय 31, रा. एमएलडी गार्डनच्या बाजूला बावधन खुर्द) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 15 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दवाराजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने ठेवलेले बॉक्स उघडून त्यातून 82 ग्रॅम वजनाचे दोन लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक महादेव यलमार तपास करीत आहेत.