breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदौर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले!
![Two coaches of Indore-Daund Express derailed near Lonavla railway station!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Lonavala-tren.jpg)
लोणावळा । प्रतिनिधी
लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदौर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरत दुर्घटना घडली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मात्र, गेल्या एक-दीड तासापासून प्रवासी अडकून पडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर डबे रुळावर आणण्याचं काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणे आठच्या सुमारास इंदौर-दौंड या एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनांकडून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. एक्स्प्रेस लोणावळा रेल्वे स्थानकात येत असताना दुर्घटना घडल्याची तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.