Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य भोसरीगाव तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम..
![Tree Group Maharashtra State Bhosarigaon Plantation Program ..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/202ed45f-de33-467a-b1ea-46899ad0f0c3.jpg)
पिंपरी – एक सामाजिक बांधिलकी म्हणुन आणि २ नोव्हेंबर डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात १ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प टायगर ग्रुप कार्यकर्ते यांनी केला आहे.यांची सुरूवात पिंपरी चिंचवड मधून पै.सिध्दार्थ भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड मधील सर्व पोलिस स्टेशनमध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात येत आहे.
आज भोसरी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड साहेब आणि टायगर ग्रुप पिं.चिं.अध्यक्ष सिध्दार्थ भाऊ गायकवाड आणि टायगर ग्रुप भोसरी चे प्रमुख मा.करण पटेकर तसेच केतन चव्हाण,पै.सतिश भालके मित्र परिवार उपस्थित होते.